किसान संघाचा धरणे आंदोलनाद्वारे इशारा
पुणे: देशभर देशभर भारतीय किसान संघाने दिनांक 1 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान शेतमालास लाभकारी मूल्य देणारा कायदा करण्याबाबत जनजागरण अभियान चालवले होते. या अभियानाची सांगता काल राज्यभरातील दोनशे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनात द्वारे केली .
शेतकऱ्याला आर्थिक स्वातंत्र्य बहाल करा
भारत देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे . या गोष्टीचा सर्वांना अभिमान व आनंद आहे .परंतु आजही भारतीय शेतकऱ्याचे आर्थिक पारतंत्र दूर झालेले नाही . शेतकऱ्याला आपल्या उत्पादित मालाचा भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य नाही व्यापाऱ्यांनी तो लिलावाद्वारे ठरावा व त्याच्या वितरण आणि साठ्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी स्थिती आजही आहे . शेतमालास उत्पादन खर्चाइतका सुद्धा भाव वर्षानुवर्षे न मिळाल्याने शेतकरी दरिद्री होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आहे . कर्जातून बाहेर पडता न आल्याने शेतकरी आत्महत्या द्वारे आपले जीवन संपत आहे . या आत्महत्या थांबता थांबत नाहीयेत .अश्या मागण्या
घेऊन आज किसान संघ पुणे शहर जिल्हा व पुणे ग्रामीण जिल्हा चे वतीने जिल्हाधिकारी साहेब पुणे यांना निवेदन दिले.
या वेळी बबनराव केन्जले कोषाध्यक्ष म.प्रांत,पुणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अशोकराव फडके पाटील,पुणे शहर जिल्हा अध्यक्ष श्री राजाराम सूर्यवंशी,रेन वॉटर हार्वेस्टिंग चे सचिव सुनील घाडगे ,श गुणवंत कंदमुळे,युवराज फडके उमेश गोरे,संदीप फडके उपस्थित होते.
नायब तहसिलदार गोंजारी यांनी निवेदन
