Tuesday, June 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ST Strike – संप मागे घ्या, मागण्या मान्य होतील – शरद पवार

मुंबई : आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सह्याद्री अतिथी गृहावर एसटी संपबाबत महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदे ‘आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदलत आहोत’, असे सांगत संघटनेच्या प्रतिनिधींकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू व्हा, संप मागे घ्या, मागण्या मान्य होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले. तसेच यावेळी एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींकडून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधण्यात आला. आमची चूक झाली, आता आम्ही वकील बदलत आहोत, असेही प्रतिनिधींनी म्हंटले आहे.

राज्यातील अनेक एसटी संघटनांनी संपातून माघार घेतल्यानंतरही विलीनीकरणाची मागणी लावून धरणाऱ्या अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी टीका केली आहे. अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्रस्तळेपणामुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आल्याची टीका या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन कर्मचाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे, हे माहिती नाही. ते सांगतात की, एसटी कर्मचारी नैराश्यात गेले आहेत. पण आम्हाला गुणरत्न सदावर्ते हेच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटतात, अशी टीका कास्ट ट्राईब परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निर्भवणे यांनी केली.

एसटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार आता गुणरत्न सदावर्ते यांच्या जागी आता वकील सतीश पेंडसे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या उपस्थितीत २२ कर्मचारी संघटनांसोबत ही बैठक झाली असून या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच यावेळी महाराष्ट्रातील प्रवासी वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. मात्र एसटी संपामुळे मागील दोन महिन्यांपासून प्रवाश्यांचे हाल झाले आहेत. एसटी संपावर तोडगा काढण्याचा सरकारने सर्वोत्तपरी प्रयत्न केला. त्यामुळे कामावर परत या, एसटी पूर्वपदावर आणा. सर्व मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading