मुंबईकरांना मोठा दिलासा; कोरोना रुग्ण संख्या सहा हजारांनी घटली
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या ही वीस हजारांच्या घरात पोहोचली होती. मात्र आज मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कालच्या तुलनेत आज मुंबईतील रुग्ण संख्या तब्बल सहा हजारांनी घटली आहे. आज दिवसभरात मुंबईत 13 हजार 648 कोरोना बंधितांची नोंद झाली आहे. दरम्यान काल (दि. 9) हीच कोरोना रुग्ण संख्या 19 हजार 474 इतकी आढळून आली होती.
मुंबईत आज तब्बल 27 हजार 214 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर मागील 24 तासांत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 1 लाख 3 हजार 862 सक्रीय रुग्ण असून मुंबईचा रिकव्हरी रेट 87 टक्के इतका झाला असल्याची आरोग्य विभागाने दिली आहे.
#CoronavirusUpdates
10th January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 13648
Discharged Pts. (24 hrs) – 27214Total Recovered Pts. – 8,05,333
Overall Recovery Rate – 87%
Total Active Pts. – 103862
Doubling Rate – 37 Days
Growth Rate (3 Jan – 9Jan)- 1.81%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 10, 2022
