सातारा विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घघाटन
सातारा : कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमातील पुढाकारा द्वारे, अल्फा लावल इंडिया, सातारा जिल्हा परिषद व Y4D या स्वयंसेवी / अशासकीय संस्थेच्या सहयोगाने सातारा विभागातील कोडोली आणि चिंचणेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुधारणेसाठी काम करत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला असून कोडोली, सातारा येथील उदघाटन समारंभाद्वारे/ समारंभादरम्यान जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.
अस्तित्वात असणाऱ्या पायाभूत वैद्यकीय सुविधा वाढवून, तसेच सुधारित साधने पुरवून व कोविड संदर्भातील काळजी घेण्यासाठी मास्क (मुखपट्टी) व स्वच्छता संच यांचा पुरवठा करून, विभागात चांगली सार्वजनिक आरोग्यसुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने, अल्फा लावल इंडिया व Y4D प्रतिष्ठान यांच्यातर्फे एप्रिल २०२१ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली होती.
या प्रसंगी बोलताना सातारा येथील अल्फा लावल कारखान्याचे व्यवस्थापक, निशिकांत गुजरे म्हणाले, “अल्फा लावलच्या पुढाकाराने केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामामुळे आपली पृथ्वी आणि त्यावरील लोकांना लाभ व्हावा असा आमचा विश्वास आहे. सदर प्रकल्पातून, सार्वजनिक आरोग्य सुविधेद्वारा वेळेवर व चांगल्या दर्जाचे उपचार तळागाळातील लोकांना उपलब्ध व्हावेत असा आमचा उद्देश आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत उद्दिष्ट २०३० साध्य करण्यातही अल्फा लावल चा सहभाग आहे. या प्रकल्पातून संयुक्त राष्ट्रांचे क्रमांक ३ चे उद्दिष्ट, अर्थात, चांगले आरोग्य व स्वास्थ्य, साध्य करण्यात सहयोग देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
