Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

11ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडणार

पुणे: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. एकीकडे कोरोनानं हैराण करुन सोडलं आहे. तर दुसरीकडे ऐन थंडीतही अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे. त्यामुळे सध्या नागरिक तर वैतागल्याचं पहायला मिळत आहे.

सध्या थंडीची तीव्र लाट असल्याचं पहायला मिळत आहे. ऐन थंडीतही अनेक भागांत पावसानं हजेरी लावली आहे. अशातच आता पुढील काही दिवस पावसाची हजेरी पहायला मिळणार आहे. 11ते 13 जानेवारीदरम्यान उत्तर पश्चिम व मध्य भारतात हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडासह पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading