ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत – डॉ. भागवत कराड
पुणे:ओबीसी समाजाला केंद्रव राज्य सरकारने अजूनही आरक्षण दिले नाही .त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबीत आहे.त्यामुळे ओबीसी समाज हा नाराज झाला आहे.निवडणुका या घेऊ नये अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यावर ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत .अशी भूमिका केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ.भागवत कराड यांनी पुण्यात पत्रकाराशी बोलताना केली.
डॉ. भागवत कराड म्हणाले, मीवंजारी समाजात लहानाचा मोठा झालो, माझ्या जडणघडणीत समाजाचा मोलाचा वाटा आहे, त्यामुळे आजचा कार्यक्रम माझ्यासाठी महत्वाचा आहे. अशे डॉक्टर भागवत कराड म्हणाले. राज्य सरकारने काल कोरोना रुग्ण संख्या वाढीमुळे नवीन नियम लावले आहेत, त्यावर कराड म्हणाले, सरकारने दिलेल्या नियमांचे पालन नागरिकांनी करायला पाहिजे असे कराड म्हणाले.
