कोविड19 बूस्टर डोससाठी नवीन नाव नोंदणीची आवश्यकता नाही
नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर देशभरात येत्या 10 जानेवारीपासून कोविड बूस्टर डोस देण्यास सुरूवात होणार आहे. यासाठी नवीन नाव नोंदणीची आवश्यकता नसल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सोमवार पासून (दि.10) सावधगिरीचा उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांना कोविड बूस्टर डोस देण्यास सुरूवात होणार आहे. यामध्ये ज्या पात्र नागरिकांनी COVID-19 लसीचे दोन डोस घेतले आहेत त्यांनाच हा कोविड बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
यासाठी पात्र नागरिकांना कोवीन अॅ प वर नवीन नाव नोंदणीची गरज नाही. आपण थेट COVID लसीकरण केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन अपॉईंटमेंट घेवून बूस्टर डोस घेवू शकतो. दरम्यान, ऑनलाइन अपॉइंटमेंटसाठी 8 जानेवारी पासून वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहिती नुसार, ज्यांना कोवॅक्सिन मिळाले आहे त्यांना कोवॅक्सिन लस तर ज्यांना कोविशील्डचे प्राथमिक दोन डोस मिळाले आहेत त्यांना कोविशील्ड लस मिळणार आहे.
#Unite2FightCorona #LargestVaccineDrive#OmicronVariant pic.twitter.com/R0lrJ0zg89
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) January 8, 2022
फोटो – संग्रही
