Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात 9 ते 11 जानेवारी दरम्यान अवकाळी पावासाची शक्यता 

पुणे : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही ठिकाणी आज पहाटेपासूनच हलक्या पावसाने सुरुवात झाली. मुंबई, ठाणे, पालघरसह बहुतांश ठिकाणी पहाटे पावसाने हजेरी लावली. त्यातचउद्यापासून 9 ते 11 जानेवारी यादरम्यान राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर 9 जानेवारीला विदर्भातील काही भागांत गारपिटीची शक्यताा वर्तवण्यात आली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासूनचं अवकाळी पावसासह गारपिटी पडायला सुरुवात झाली होती. जानेवारीतही राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊसाने शेतमालाचे नुकसान केले आहे. त्यातच आता विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारतातील हवामान बदलामुळे पुढील 2, 3 दिवस अरबी समुद्रातून‌ आद्रता राहणार आहे. यामुळे मध्य भारतात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येतील. यामुळे महाराष्ट्रात 9 ते 11 जानेवारीदरम्यान विदर्भातील काही भागात हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर 9 ते 11 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता ज्येष्ट हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितली.

राज्यातील राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडसणार आहे, तर रविवारी म्हणजेच 9 जानेवारी ला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading