पाच राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर; 10 मार्चला मतमोजणी
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाच राज्यातील निवडणुका आज जाहीर झाल्या आहेत. निवडणूक आयोगाने आज या पाच राज्यातील निवडणुक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार असून पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि माणिपूर राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार आहेत. तसेच 10 मार्च रोजी पाचही राज्यातील निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
15 जानेवारीपर्यंत रॅली, सभांना बंदी
देशातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारावर निर्बंध घातले आहे. 15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, सायकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले असून डोअर टू डोअर प्रचारासाठी केवळ पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
मतदानाच्या तारखा –
उत्तर प्रदेश (सात टप्प्यात मतदान )
पहिला टप्पा – 10 फेब्रुवारी 2022
दुसरा टप्पा – 14 फेब्रुवारी 2022
तिसरा टप्पा – 20 फेब्रुवारी 2022
चौथा टप्पा – 23 फेब्रुवारी 2022
पाचवा टप्पा – 27फेब्रुवारी 2022
सहावा टप्पा – 3 मार्च 2022
सातवा टप्पा – सात मार्च 2022
पंजाब, गोवा, उत्तराखंड – 14 फेब्रुबारी 2022 रोजी मतदान
माणिपूर – 27 फेब्रुबारी रोजी मतदान
