Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

संतापजनक : रिक्षाभाड्याचे पैसे नसल्याने चालकाने केले परदेशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे : परदेशी अल्पवयीन मुलीकडे रिक्षा भाडे देण्यासाठी पैसे नसल्याच्या मजबुरीचा फायदा घेवून नराधम रिक्षा चालकाने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी १६ वर्षीय पिडीत मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसानी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.

सागर विभीषण बचुटे (वय २४, रा. अप्पर इंदिरानगर), विकीकुमार फुलो पासवान (वय २३,) आणि अशोक वीरबहाद्दूर थापा (वय २२, दोघीही रा. फुरसुंगी ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सागर हा रिक्षा चालक आहे. तर, इतर दोघे त्यांचे साथीदार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी व तिची मैत्रिण या पाच जानेवारी रोजी बुधवार पेठ येथे रिक्षाने येत होत्या. पण, त्यांच्याकडे रिक्षा भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. प्रवासादरम्यान आरोपी  रिक्षाचालक सागर याला ही बाब कलाली. मुलींच्या या अडचणीचा फायदा घेत. आरोपी सागर याने पिडीत मुलीवर रेसकोर्स परिसरातील झाडीमध्ये बलात्कार केला. इतकेच नव्हे तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पिडीत मुलगी राहत असलेल्या ठिकाणी आरोपी पासवान व थापा गेले. यावेळी त्यांनी पिडीत मुलगी व तिच्या मैत्रिणीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलाहोता.

दरम्यान, हडपसर पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेवून गुन्हा दाखल करून घेतला असून या तिन्ही आरोपींना गजाआड केले आहे. हडपसर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading