Monday, October 26, 2026
Latest NewsPUNE

चुकीच्या कामाचा महापालिकेला आर्थिक फटका

पुणे:सल्लागार कंपनीने आराखडा करताना जलवाहिन्या टाकण्याच्या कामात ट्रान्समिशन वाहिन्या टाकण्याच्या कामाचा समावेश केला नाही. ही बाब महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्याही दोन वर्षांनंतर लक्षात आली. त्यामुळे या अतिरिक्त कामासाठी पाणीपुरवठा विभागाने ५२ कोटी ६८ लाखांची निविदा प्रक्रिया राबवावी लागली होती. त्याचा अतिरिक्त खर्च महापालिकेला पेलावा लागला होता. त्यावरून सल्लागार कंपनीकडे महापालिकेने विचारणाही केली होती. सल्लागार कंपनी ५ लाखांचा दंड ठोठाविण्यात आला होता.
गावांमध्येही योजना
महापालिका हद्दीत चार वर्षांपूर्वी ११ गावांचा, तर जून महिन्यात २३ गावांचा अशा एकूण ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. शहरात समान पाणीपुरवठा योजनेला मान्यता देताना गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाली नव्हती. मात्र आता गावांचा समावेश झाल्याने या गावांमध्येही समान पाणीपुरवठा योजनेची अंमलबाजवणी करावी लागणार आहे. नवा सल्लागार नियुक्त करताना योजनेची अंमलबजावणी गावांमध्येही होण्याची शक्यता आहे.
कामे संथ गतीने
समान पाणीपुरवठा योजनेची कामे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या योजनेची कामे संथ गतीने सुरू आहेत. त्याबाबत महापालिका प्रशासनाने संबंधित कंपनीला कारणे दाखवा नोटिसही वेळोवेळी बजाविली आहे. ही योजना २ हजार ५२१ कोटींची आहे. यामध्ये नव्याने जलवाहिन्या टाकण्याबरोबरच जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांच्या कामांची दुरुस्ती, जलमापके बसविणे आणि ८३ साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading