Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

उद्या पासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून उद्या पासून काही भागात चार दिवस जोरदार सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून ऐन थंडीत अवकाळी पाऊस बरसात आहे. अवकाळी पावसाने शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच अजूनही पाऊस थांबलेला नसून 7 जानेवारीपासून काही भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात 7 ते ९ जानेवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही जोर काहीसा वाढणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading