कालीचरण महाराजला एक दिवसाची पोलीस कोठडी
पुणे : छत्तीसगढमधील रायपुरमध्ये झालेल्या धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराजला यापूर्वीच अटक केली आहे. आज छत्तीसगढ पोलिसांकडून कालीचरण यांचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. आज कोर्टात सुनावणी झाली कालीचरण महाराजाना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती कालीचरण महाराजाच्या वकीलानी दिली.
समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे काही दिवसांपूर्वी नातुबाग मैदानात शिवप्रतापदिन कार्यक्रमात आयोजित केला होता. या कार्यक्रमात समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे भडकाऊ आणि चिथावणीखोर भाषणे केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यासह समस्त हिंदू आघाडीतील कार्यकर्त्यांवर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सादर प्रकरणी कार्याध्यक्ष मिलींद रमाकांत एकबोटे, मोहनराव शेटे, दिपक बाबुलाल नागपुरे, कॅप्टन दिगेंद्रकुमार नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांच्याविरुद्ध खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरणने कार्यक्रमात अन्य धर्माच्या नागरिकांच्या भावना दुखावल्या जातील तसेच धार्मिक श्रध्दांचा अपमान समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल, असे भाषण केले होते.
