Sunday, November 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

समीर वानखेडेंची एनसीबीतून बदली

मुंबई : आर्यन खान याच्या अटकेमुळे प्रकाश झोतात आलेले मुंबई एनसीबीचे विभागीय आयुक्त  समीर वानखेडे यांची बदली करण्यात आली आहे. वानखेडे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांची केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागात बदली करण्यात आली आहे. यापूर्वी समीर वानखेडे हे केंद्रीय सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्क विभागातच कार्यरत होते.

दरम्यान, कालच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे कार्यकाळ संपल्यानंतरही  मुदतवाढ मिळावी यासाठी भाजप नेते दिल्लीत लॉबिंग करत असल्याचा आरोप केला होता. यावेळी नवाब मलिक यांनी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवत समीर वानखेडेंवर निशाणा साधला होता.

 

Leave a Reply