Monday, November 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबईतील शाळांबाबद मोठा निर्णय; ‘या’ तारखे पर्यंत शाळा राहणार बंद

पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद

फक्त 10 वी व 12 वी चे वर्ग राहणार सुरू

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील जवळपास 90 टक्के रुग्ण हे मुंबईत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका अंतर्गत येणाऱ्या पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आकरावीचेही वर्ग 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहेत. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे.

इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लस देण्याबाबत आढावा घेण्यासाठी आज शालेय शिक्षण मंत्री यांनी तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईमधील पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्यात आल्या होत्या.

Leave a Reply