Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत उद्या निर्णय – महापौर मुरलीधर मोहोळ

उद्या पालकमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक 

पुणे : गेल्या आठवड्याभरात शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या चार पटीने वाढली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. कोरोना परिस्थिती बाबद आढावा घेण्यासाठी उद्या पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत पुणे शहरात पुन्हा निर्बंध लागू होणार की नाही? याचा निर्णय ठरेल, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आज पुणे शहरातील काही दिवसातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येबाबत पक्षनेते पालिका आयुक्त यांच्या समवेत बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुरलीधर मुळे म्हणाले ,पुढील काळात निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. शहरात काही लोकं विना मास्क फिरत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून भरारी पथके शहरात तैनात असणार आहेत. जी लोक विना मास्क फिरत करत असतील. त्यांच्याकडून भरारी पथके दंड वसूल करणार आहेत असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

शहरात रोज मोठ्या प्रमाणावर नव्यानं कोरोना बाधित रुग्ण होत आहेत. लसीकरण पूर्ण झालेल्यांना देखील कोरोनाची लागण होत आहे. त्यावर मुरलीधर मुळे म्हणाले. त्यांच्यापैकी किती जणांनी लसीकरण केलय याची माहिती घेतली जातेय, असेही मोहोळ म्हणाले.

शहरात किती लसी उपलब्ध आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर मोहोळ म्हणाले, 4 हजार रेमडीसीव्हीर महापालिकेकडे आहेत. ज्यांनी अजूनही दुसरा डोस घेतला नाही त्यांचा दुसरा डोस पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार. येत्या 10 जानेवारी पासून फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. कोविड केअर सेंटर (सीसीसी) तयार करण्यात येणार असून लहान मुलांसाठी लागणाऱ्या औषधांची तयारी केली आहे, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.

Leave a Reply