Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

महाविकास विकास आघाडी सरकार घालवायचे हाच नवीन वर्षाचा संकल्प – रामदास आठवले

पुणे : आमचा रिपब्लिकन पक्ष या वर्षी अंत्यत मजबूत करायचा आहे. सर्व जाती धर्मातील व्यक्तीना पक्षामध्ये एकत्र आणण्याच आणि समाजातील आर्थिक उन्नतीसाठी काम करायचे आहे. अशी आमची कामगिरी राहणार आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार घालवयाच हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प असणार आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

आज भीमा कोरेगाव येथे शौर्य स्तंभास अभिवादन करण्यात रामदास आठवले आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले , भीमा कोरेगाव येथे शौर्य स्तंभास आज मी अभिवादन करण्यास आलो आहे. त्या निमित्ताने मी आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, बाबासाहेब आंबेडकर यांच स्वप्नं साकारण्यासाठी एकजुटीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. त्या बाबतची माझी तयारी आणि भूमिका आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading