15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी प्रक्रिया सुरु; येथे करा नोंदणी
मुंबई : गेल्या आढवड्याभरा पासून राज्यात कोरोना बंधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मुलांच्या शाळा देखील चालू असल्याने त्यांचे लसीकरण कधी होईल या चिंतेत पालकवर्ग आहे. केंद्राने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार येत्या तीन जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु होणार आहे. आजपासून (1 जानेवारी) 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने मुलांच्या नावाची नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात लहान मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
नावनोंदणी काशी करायची ?
– कोवीनच्या https://www.cowin.gov.in या वेबसाईटवर जाऊन नावनोंदणी करता यईल
– आधारकारर्ड तसेच शाळेतील ओळखपत्रावरून मुलांचे लसीसाठी नाव नोंदवता येईल
– वेबसाईट वरील ‘अॅड मोअर’ या बटनावर क्लिक करुन एका मोबाईल क्रमांकाच्या मदतीने चार मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी करता यईल
