Saturday, May 9, 2026
BusinessLatest News

पुण्यातील ग्राहकांनी कार खरेदीच्या अनुभवाचा पुरेपूर आनंद घेतला, ७५% होम डिलिव्हरीज

पुणे : स्वतःची कार असली पाहिजे हा विचार ज्या वर्षामध्ये अधिकाधिक प्रबळ झाला त्यावर्षी स्पिनीच्या बाजारपेठेतील आकडेवारीत अनेक आश्चर्यजनक बाबी आढळून आल्या.  पुणे बाजारपेठेत स्पिनीच्या ग्राहकांपैकी ५९% जण स्वतःची पहिली कार खरेदी करणारे होते तर २८% महिला कार खरेदीदार होत्या.

ग्राहकांनी होम डिलिव्हरी सेवेला चांगला प्रतिसाद दिला, ७५% ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला तर ३४% ग्राहकांनी संपूर्ण खरेदी ऑनलाईन पद्धतीने केली.  कार ब्रँड्सच्या बाबतीत  ग्राहकांनी सर्वाधिक पसंती मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि वोल्क्सवॅगनला दर्शवली आहे तर कार मॉडेल्समध्ये अल्टो ८००, ग्रँड आय१०, वॅगनआर आणि रंगांमध्ये सर्वाधिक पसंती सफेद, ग्रे आणि सिल्व्हर  यांना मिळाली आहे.

स्पिनीज २०२१चे नीरज सिंग यांनी सांगितले, “महामारी आणि त्यानंतरच्या संपूर्ण काळात स्पिनीने #withExtraCare  चे पालन करत होम डिलिव्हरी आणि होम टेस्ट ड्राईव्ह्जवर लक्ष केंद्रित केले.  स्वतःची कार असणे ही आता काही तितकीशी अपूर्वाईची बाब राहिली नाही आणि शहरी भारतात तर स्वतःची कार असण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेही एक गरज असल्याचे मानले जाऊ लागले आहे.  गुणवत्तामानकीकरण आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन तयार करण्यात आलेल्या स्पिनी अश्यूअर्ड®च्या चार आधारस्तंभांवर आमचा सर्वाधिक भर असल्याने प्री-ओन्ड कार कंपनी म्हणून ग्राहक आमच्यावर विश्वास ठेवतात आणि कार खरेदीदारांसोबत आयुष्यभराचे नाते विकसित होत राहावे असा आमचा प्रयत्न असतो.  देशातील प्रत्येक घरात उत्तम दर्जाची कार असावी हे आमचे उद्धिष्ट आहे आणि आमची आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की आम्ही त्या दिशेने प्रगती करत आहोत.”

महामारीची सर्वात मोठी लाट आलेली असताना आमची तत्त्वे आणि धोरणांना अनुसरून आम्ही स्पिनी #withExtraCare हा विशेष उपक्रम सुरु केला.  यामध्ये आम्ही ग्राहकांना होम टेस्ट-ड्राईव्ह्जच्या संधी उपलब्ध करवून दिल्यात्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या सर्व प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले.

ग्राहकांच्या सवयींमध्ये होत असलेले बदल आणि ग्राहकांनी स्पिनीच्या सेवांवर ठेवलेला विश्वास यामधून ठळकपणे दिसून येतो.  त्यांच्या वेबसाईटवर सर्व तपशील देण्यात आलेले आहेत.  फिक्स्ड प्राईस अश्युरन्स५ दिवसात पैसे परत मिळण्याची गॅरंटी२०० इन्स्पेक्शन पॉईंट्स आणि १ वर्षाची स्पिनी वॉरंटी अशा पारदर्शक धोरणांमुळे ग्राहकांना घरबसल्या निर्णय घेता येतात.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading