Saturday, May 9, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maharashtra corona update : दिवसभरात 5 हजार 368 नवे कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे. राज्यात आज कोरोनाचे 5 हजार 368 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 450 ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत. तर दिवसभरात 22 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील 5 हजार 368 कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत 3 हजार 928 रुग्णांची नोंद झाली आहे.  त्या पाठोपाठ ठाण्यात 864 आणि पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 520 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.

देशात एका दिवसात 10 हजारापेक्षा अधिक रुग्ण

मागील 24 तासांत देशभरात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, गेल्या 33 दिवसांनंतर एका दिवसात एवढे रुग्ण समोर आले आहेत. याच वेळी, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढत असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. सध्या देशातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 82 हजार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading