खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
पती सदानंद सुळेंचा अहवालही पॉझिटिव्ह
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह पती सदानंद यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज ट्विटरवरून ही माहिती दिली. त्यामुळे आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.
— Supriya Sule (@supriya_sule) December 29, 2021
