भाईजान बनला ‘रिक्षावाला…’
चित्रपटात बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने आजपर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र खऱ्या जीवनातही भाईजानला वेगवेगळ्या भूमिका निभावण्याचा मोह आवरत नाही. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तो पनवेलच्या रस्त्यांवर रिक्षा चालवताना दिसत आहे. सलमान खान मंगळवारी रात्री पनवेलजवळ फिरायला गेला होता. यावेळी त्याने रिक्षा चालवण्याचा आनंद घेतला. हा व्हिडीओ लहान असला तरी त्यात सलमान स्पष्ट दिसत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच सलमान खानने आपला वाढदिवसानिमित्त पनवेल येथील फार्महाऊसवर साजरा केला आहे. अन् त्याच्या एक दिवस आधी त्याला सर्पदंश झाला होता.
