Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात; तीनजण जागीच ठार

पुणे : पुणे – सातारा महामार्गावरील नवले पुलावर होणारी अपघाताची मालिका थांबण्याच नाव घेत नाहीये. अपघातांचा हॉटस्पॉट बनत चाललेल्या या पुलावर आज सकाळी पुन्हा एकदा येथे भीषण अपघात झाला. पुण्याहुन सातारला जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तिघांना उडवले असून, यात ३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. उतारावर ट्रक मागे सरकल्याने पाठिमागून येणाऱ्या वाहनांना त्याची धडक बसल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 9 च्या सुमारास हा अपघात झाला

पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली त्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला तिघे तरुण उभे होते त्यांना ट्रक ने जागेवर चिरडले. सिहगड पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास करत आहेत. या अपघातांमुळे वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading