पुणे जिल्ह्यात कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून आतापर्यंत 45 कोटी 72 लाख 21 हजार 567रुपये दंड वसूल
पुणे : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० लाख ७६ जणांवर आता पर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पुणे जिल्ह्यात गेल्या एक वर्ष नऊ महिन्यांत 45 कोटी 72 लाख 21 हजार 567रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मागील एका आठवड्यात 894 जणांवर कारवाई
जिल्हा प्रशासनाकडून विना मास्क फिरणाऱ्या, रस्त्यांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर महापालिका, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत स्तरावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. मागील एका आठवड्यात 894 जणांवरील कारवाईत पाच लाख ७२ हजार ४२० रुपये वसूल करण्यात आले.
पुणे शहर पोलिसांनी 50 जणांकडून 25 हजार रुपये वसूल केले. त्यामध्ये पुणे महापालिका प्रशासनाने 93 जणांवर कारवाई करीत 75 हजार 720 रुपये वसूल केले आहेत.पुणे शहर पोलिसांनी ५० जणांकडून २५ हजार रुपये वसूल केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. तर पिंपरी पोलिसांनी तब्बल 524 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन लाख 63 हजार रुपये वसूल केले आहेत. पुणे ग्रामीण भागात ग्रामपंचायतींकडून शून्य कारवाई असून, पोलिस विभागाने 218 जणांकडून एक लाख 4हजार 200 रुपये दंड वसूल केला. जिल्ह्यातील नगरपालिकांनी केवळ नऊ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून चार हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला
शहरात कोरोनाची तिसरी येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने महापालिका कामाला लागली आहे. सध्या नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाल्याचे पाह्यला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांकडून मास्कचा वापर कमी झाला आहे. यामुळे कोरोना प्रसार होण्याची शक्यता आल्याने महापालिकेने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा वेग वाढवला आहे. अशी माहिती महापालिका आरोग्य प्रमुख आशिष भारती यांनी दिली.
जिल्ह्यातील कारवाई आणि दंडवसुली
पुणे मनपा कारवाई सांख्य 30,814 तर 1,49,19,70 रुपये दंड वसूल
पुणे पोलिसकारवाई संख्या 5,37,856 तर 26,40,52,850 रुपये दंड वसूल
पिंपरी-चिंचवड मनपा
कारवाई 26,887 तर 1,74,60,497 रुपये दंड वसूल
पिंपरी-चिंचवड पोलिस
कारवाई 86,334 तर 4,56,12,800 रुपये दंड वसूल
ग्रामपंचायती कारवाई संख्या
70,705 तर 2,31,73,850 रुपये दंड वसूल
ग्रामीण पोलिस
कारवाई संख्या1,67,873 तर6,23,05,770 रुपये दंड वसुल
नगरपालिका
कारवाई संख्या 84,203तर2,98,76,744 रुपये दंड वसूल
