Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विधानसभा अध्यक्षपद निवडणुक : निवडीचा गुंता कायम; राज्यपालांनी घेतली ‘ही’ भूमिका  

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेणे हे घटनाबाह्य आहे, अशी भूमिका राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज घेतली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद निवडीचा गुंता अधिकच वाढला आहे.

राज्यपालांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात असे म्हटंले आहे की, “विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियम बदलण्यात आला आहे. हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया ही घटनाबाह्य आहे.” त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक कधी होणार आणि कशी होणार याबाबत गुंता कायम आहे.

दरम्यान, राज्यपालांनी अध्यक्षपद निवडीला नकार दर्शवल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कडून पुन्हा एकदा तिसरे पत्र राज्यपालांना पाठवले जाणार असल्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading