Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिला पोलिसाच्या हाती 

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री अजित पवार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या गाडीचे सारथ्य मूळच्या कोल्हापूर येथील असलेल्या एका महिला पोलिसांनी केले. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये दिवसभर हा चर्चेचा विषय होता. या गाडीत अजित पवारांसाह उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे देखील होते.

तृप्ती मुळीक असे या महिला पोलिसाचे नाव. अजित पवार यांच्या ड्रायव्हरला काही कामासाठी बाहेर जावे लागले म्हणून त्यांची गाडी तृप्ती मुळीक या महिला पोलीसांनी चालवली. विशेष म्हणजे नुकतेच तृप्ती मुळीक यांनी व्हीआयपी ड्रायव्हिंग कोर्स पूर्ण केला असून आज पहिल्यादांच नवीन जबाबदारी पार पाडली आहे.

महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा लोकनेते शरद पवार यांचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार हे समर्थपणे पुढे नेत असल्याचे यातून दिसून येते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे. अजित पवार व तृप्ती मुळीक या महिला पोलीस चर्चेत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading