टीईटी परीक्षा गैरव्यवहार : आयुक्त तुकाराम सुपेंकडून आणखी घबाड हस्तगत
पुणे : टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून आज पून्हा 33 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. आत्ता पर्यंत त्यांच्याकडून 3 कोटी 16 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. तसेच दीड किलो सोन्याची दागिने देखील सायबर पोलिसांनी जप्त केले आहे.
सुपे यांच्याकडून काल सायबर पोलिसांनी 25 लाख रुपये हस्तगत केले होते. अत्ता पर्यंत सुपे यांच्याकडून 3 कोटी 11 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे. अशी माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे. ज्या व्यक्तीकडे सुपे यांनी पैसे ठेवले होते त्याच व्यक्तीने स्वतः हुन सायबर पोलिसांकडे पैसे आणून दिले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केले. तर सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर एका व्यक्तीने दहा लाख रुपये आणून दिले आणि काल पुन्हा 25 लाख दिले आणि आज 33 लाख पुन्हा आणुन दिल्याने एकूण 3 कोटी 11 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे.
