कर्तव्य फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न
पुणे लष्कर भागातील कर्तव्य फाउंडेशनच्या सन २०२२ च्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन मथुरावाला यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेस कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष दिलीप गिरमकर ,सहा.पोलीस निरीक्षक हरिष शिळमकर, सहा.पोलीस निरीक्षक मनमित राऊत, व्हीक्टरी चित्रपटगृहाचे फारुखशेठ चिनाॅय, फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे,कार्याध्यक्ष अशोक देशमुख, उपाध्यक्ष सचिन कांबळे, डाॅ.बंटी धर्मा,रवीशेठ पवार, मन्सूरभाई शेख, अमित व्होरा,सुनील बाथम आदी उपस्थित होते.
या दिनदर्शिकेमध्ये वार,तिथी, सण, उत्सव, दिनविशेष, जयंती,पुण्यतिथी व मान्यवरांचे वाढदिवस आदींची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सचिन मथुरावाला व सहा.पोलीस निरीक्षक हरिष शिळमकर यांनी आपल्या मनोगतातून दिनदर्शिकेस शुभेच्छा दिल्या,अध्यक्ष विकास भांबुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
