fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsSports

पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत एमसीए वेस्ट झोन संघाला विजेतेपद

पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी  फिल्ट्रम चॅलेंजर करंडक निमंत्रित 25 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत डावखुरा फिरकी गोलंदाज ओमकार मोहिते(5-47 व 4-49)च्या भेदक गोलंदाजीसह अनिकेत नलावडे(96धावा) याने केलेल्या धावांच्या जोरावर एमसीए वेस्ट झोन संघाने युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाचा 9 गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.
 
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या अंतिम फेरीच्या तीन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाच्या आज 9षटकात 2बाद 53धावापासून खेळ सुरू झाला. तत्पूर्वी पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना युनायटेड स्पोर्ट्स क्लब: 33.3षटकात 131 धावावर संपुष्टात आला.  याच्या उत्तरात एमसीए वेस्ट झोन संघाचा डाव 39.5षटकात 181धावा करून संघाला पहिल्या डावात 50 धावांची आघाडी मिळवली.
 
दुसऱ्या डावात एमसीए वेस्ट झोनच्या ओमकार मोहिते(4-49), क्षितिज पाटील(3-36), प्रथमेश बाजारी(2-2)यांनी केलेल्या अचूक गोलंदाजीपुढे युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डाव 34.3षटकात सर्वबाद 119धावावर कोसळला. यात प्रद्युम्न महाजनने सर्वाधिक 67 धावा केल्या. विजयासाठी 70 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या एमसीए वेस्ट झोन संघाने हे आव्हान 14.1षटकात 1बाद 72 धावा करून पूर्ण केले. यात वैभव पाटील 25, उसामा पारकर नाबाद 20, ऋषिकेश राऊत नाबाद 19 यांनी धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. सामनावीर ओमकार मोहिते ठरला. 
 
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, एमसीएचे अध्यक्ष विकास काकतकर, फिल्ट्रमचे व्यवस्थापकीय संचालक निरंजन किर्लोस्कर,  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागू व क्रिकेट विभागाचे सचिव विनायक द्रविड, इंद्रजीत कामतेकर, कपिल खरे आदी मान्यवर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading