Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

खुल्या बाजारातून वीज खरेदी केली तर महापालिकेचे वर्षाला १२ कोटी रुपयांचे बिल कमी होणार

पुणे : थेट महावितरणकडून वीज विकत न घेता खुल्या बाजारातून (ओपन ॲॅक्सेसद्वारे) वीज खरेदी केली तर महापालिकेचे वर्षाला १२ कोटी रुपयांचे बिल कमी होणार आहे. यासाठी एनर्जी एफिशियन्सी सर्विस लिमिटेडची (ईईएसएल) उपकंपनी असलेल्या कव्हर्जन एफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (सीईएसएल) या शासकीय संस्थेसोबत वीज खरेदीचा २० वर्षांसाठी करार करण्यात येणार आहे. यामुळे पाणी पुरवठ्याच्या वीज बिलात प्रतियुनिट किमान ७६ पैशांचा फायदा होणार आहे.

महापालिकेच्या शहरातील मिळकती, पाणी पुरवठा प्रकल्प, मैला शुद्धीकरण प्रकल्प, उद्याने, पथदिवे यांसह अनेक ठिकाणी वीज मीटर आहेत. यासाठी चालू आर्थिक वर्षात २९३ कोटींच्या वीज बिलासाठी खर्चाची तरतूद आहे. यामध्ये पाणी पुरवठा प्रकल्पासाठी १२५ कोटी रुपयांचा खर्च आहे. विद्युत विभागाने एनईआरसीच्या नियमानुसार एक मेगा व्हॅटपेक्षा जास्त वीज वापर असलेल्या वीज ग्राहकांची यादी तयार केली. या यादीनुसार विद्युत विभागास सर्व पाणीपुरवठा विभागाकडील जलशुद्धीकरण केंद्र व उपसा केंद्रासाठी दर वर्षाला १५ कोटी ४२ लाख ६५हजार ४०० किलोव्हॅट वीज वापर होत आहे. यासाठी ओपन अॅक्सेसमधून वीज घेतल्यास सध्याच्या दरापेक्षा किमान ७६ पैसे प्रति युनिट बचत होऊ शकते. प्रति महिना वीज वापराच्या खर्चात एक कोटी व वर्षाला १२ कोटींची बचत शक्य आहे. यासंदर्भात विद्युत विभागाकडून स्थायी समितीला प्रस्ताव दाखल झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading