विकृतीकडे डोळेझाक हाच भाजपचा परीपाक – गोपाळदादा तिवारी
पुणे : देशाच्या व राज्याच्या अस्मितेवर घणाघात करणाऱ्या विकृत कृत्याकडे स्वतःची डोळेझाक व दुर्लक्ष करणे देशातील जबाबदार सत्ताधारी पक्षाला शोभणारे नाही.त्याविषयी भाजप नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेवून संबंधितांवर तातडीने कारवाई करणे आवश्यक असून याविषयी माफी देखील मागण्यांचे गरज असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाची अस्मिता आहे कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर जो निंद्य प्रकार करण्यात आला त्यावर तातडीने निषेध नोंदवून सक्त कारवाई करणे अपेक्षित असताना कर्नाटकाचे भाजपचे मुख्यमंत्री बोम्मई मात्र या घटनेला क्षुल्लक घटना म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी व्यक्त झालेल्या विकृत घटनेला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.आणि भाजपचे राष्ट्रीय नेते देखील या विषयी ना खेद ना खंत व्यक्त करत व्यक्त करतात ही शरमेची बाब आहे. काही महिन्यांपूर्वी अहमदनगरचे उपमहापौर छिंदम यांने अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी निंदानालस्ती करणारे वक्तव्य केले होते. सिनेअभिनेत्री कंगना राणावत हिने स्वातंत्र्य हे भिकेने मिळाले आहे असे सांगून समस्त स्वातंत्र्यसेनानीचां अपमान व अवमान केला. मात्र तिला भाजप सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला या घटना कशाचे द्योतक आहे असा सवाल कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ दादा तिवारी यांनी केला आहे.
केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्यावर मागील निवडणुकीपूर्वी शिव छत्रपतींचे स्मारक अरबी समुद्रात उभारणे बाबत मोठा गाजावाजा करून ढोल पिटून व करोडोंच्या जाहिराती प्रसिद्धीसाठी देवून, तसेच पंतप्रधान मोदींनी नावेत जाऊन भूमीपूजन केले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे इंदू मिल येथे मोठे इव्हेण्ट करून भूमीपूजन केले मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही स्मारकाबाबत ब्र शब्द सुद्धा काढत नाहीत राष्ट्रीय अस्मितांचे बाबतीत निवडणूक काळात राजकीय स्वार्थ साधण्याचा सततचा मतलबी प्रयत्न हाच भाजपचा अजेंडा आहे आणि हीच भाजपची संस्कृती आहे काय ? असे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. आज राज्यात व शहर जिल्ह्यात शिव छत्रपतींच्या विषयी भाजपच्या दुटप्पी भूमिकेविरोधात राज्यभर निदर्शने करण्यात आली असेही कॉंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले
