Saturday, October 31, 2026
BusinessLatest News

आयएसडब्ल्यूएआयतर्फे महाराष्ट्र सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक

मुंबई : द इंटरनॅशनल स्पिरिट्स अॅण्ड वाईन्स असोसिएशन ऑफ इंडिया (ISWAI), या प्रीमिअम अल्कोबेव्ह क्षेत्राीतल सर्वोच्च संघटनेने आज नमूद केले की त्यांच्या सदस्यांनी आयात केलेले मद्य आणि इतर कंट्री-ऑफ-ओरिजिन-स्पेसिफिक स्पिरिट्सच्या किमती 30-36 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या पुरोगामी धोरणांशी असलेली बांधिलकी या प्रयत्नांतून प्रतित होत आहे. आयात केलेल्या मद्य उत्पादनांवरील आयातशुल्क कमी करण्याच्या (३०० टक्क्यांवरून १५० टक्के) राज्य सरकारच्या निर्णयामुळे किमतींमध्ये सुसूत्रता येईल आणि इतर राज्यांमधून होणारे स्मगलिंग कमी होण्याची आशा आहे तसेच विक्रीत वाढ होऊन राज्याच्या महसुलात वाढ होईल, असा विश्वास आयएसडब्ल्यूएआयला वाटतो.

 

आयएसडब्ल्यूएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निता कपूर म्हणाल्या, “एकूण क्षेत्राच्या तुलनेत बॉटल्ड-इन-ओरिजिन (बीआयओ) विभागाचा वाटा अत्यल्प म्हणजेच १.५ टक्के आहे. अधिक किंमत मूल्य असलेला आणि ग्राहकांचा आवडता असा हा फार खास आणि प्रीमिअम विभाग आहे. आयात केलेले बीआयओ आणि मद्यविभागासाठी दिल्ली, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि गोवा अशा इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही किमतीत समानता आणण्याचे धोरण स्वीकारल्याने आता हे मद्य ग्राहकांना सहज उपलब्ध होणार आहे.”

 

भारतातील एक आघाडीची अल्कोहोलिक ब्रेव्हरेजेसची आयातदार आणि वितरक कंपनी ब्रिंडको लिमिटेडचे ग्रूप एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अमन ढाल म्हणाले, “प्रीमिअम इम्पोर्टेड स्पिरिट्स आणि इतर कंट्री-ऑफ-ओरिजिन मद्यांच्या विक्रीत वाढ झाल्याचे आम्ही अनुभवत आहोत. बीआयओ उत्पादनांना वाढता प्राधान्यक्रम आणि मान्यता मिळत आहे. महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय अल्कोबेव्ह क्षेत्रासाठी नक्कीच एक स्वागतार्ह निर्णय आहे आणि विशेषत: ग्राहकांसाठी. कारण यामुळे बाजारपेठेतील बनावट आणि अवैध विक्रीला चाप बसेल.”

आयएसडब्ल्यूएआय आपल्या सदस्य कंपन्यांसोबत राज्य सरकारला त्यांच्या सातत्यपूर्ण आणि पुरोगामी मद्य धोरणांसाठी पाठिंबा देते आणि अल्कोहोलिक ब्रेव्हरेजेसच्या जबाबदार वापरासंदर्भात सामान्य ग्राहकांमध्ये जनजागृती आणणे हा त्यांचा उद्देश आहे.

 

Leave a Reply