रमणबाग प्रशालेमध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा
पुणे : न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये बुधवार दि.22 डिसेंबर 2021 रोजी गणितज्ञ रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेचे पर्यवेक्षक श्री दिलीप रावडे यांच्या संकल्पनेतून प्रशालेचे माजी विद्यार्थी कुणाल चौधरी यांनी गणिता मधील चिन्हांची रांगोळी फरसबंद चौकात रेखाटली.
ज्येष्ठ गणित शिक्षक श्री योगेश पडदुणे यांनी रामानुजन यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
मुख्याध्यापक श्री.सुनील शिवले यांनी रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रामानुजन यांच्या जीवनावर आधारित माहितीपट इयत्ता आठवी -नववीच्या विद्यार्थ्यांना दाखवण्यात आला. इयत्ता आठवी यलो मधील श्रीयश राशिनकर याने रामानुजन मॅजिक स्क्वेअर तयार केले. उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार, विषय प्रमुख अनघा काकतकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
