Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये राष्ट्रीय गणितदिन साजरा

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस सेकंडरी स्कूलमध्ये राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे उपाध्यक्ष महेश आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

त्रिकोणमिती, वर्तुळ, अनिमेशनमागील गणित, अंकगणित, संगणकशास्त्रासाठी आवश्यक असणारी गणितीय प्रक्रिया अशा विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.

थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त गणित दिवस साजरा केला जातो. आठवले यांनी मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रकल्पांची प्रशंसा केली.

सोसायटीचे कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, आजीव सदस्या प्राजक्ता प्रधान, ॲड. राजश्री ठकार यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्याध्यापिका ज्योती बोधे यांच्या संकल्पनातून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading