उपमुख्यमंत्री मेट्रोचे काम सुरु करण्याचे आदेश देतात दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी सभागृहात का गोंधळ घालतात? महापौरांचा सवाल
पुणे: एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश देतात. आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी महापालिका सभागृहात का गोंधळ घालतात?.असा सवाल महापौर मुरलीधर मोहळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज पत्रकार परिषदेत विचारला आहे.
या पत्रकार परिषदेला सभागृह नेते गणेश बिडकर स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने उपमहापौर सुनिता वाडेकर उपस्थित होत्या.
आज पुणे महानगरपालिकेची खरंतर मुख्य सभा होती. पण ही सभा आज तहकुब करण्यात आली. विरोधी पक्षानी आज सकाळपासून पालिकेत पुण्यात लकडी पूल हाबांधण्यात येऊ नये म्हणून.
विरोधी पक्षांनी आंदोलन केले. राष्ट्रवादी कांग्रेस, पार्टी कांग्रेस, मनसे, व शिवसेना या पक्षांनी सकाळपासून विविध पोस्टरबाजी करत आंदोलन केले. त्यांनी सभागृहात पण आंदोलन केले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आत्ता झालेल्या गणपतीचे आधीपासूनच आम्ही गणपती मंडळा बरोबर सलग तीन महिने चर्चा केली. त्या बैठकीमध्ये सगळ्यांना लकडी पुल हा बांधायला होकार होता. त्यावर अजित पवारांनी पोलीस देखरेखीत पुणे मेट्रोचं काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
या बाबतीत स्पष्ट उल्लेख मेट्रोनं पुणे महापालिकेला दिलेल्या पत्रात केला आहे. जेव्हा लकडी पुलावरचं मेट्रोचं काम थांबवण्यात आलं त्यानंतर या कामावर आक्षेप घेणाऱ्या शहरातील गणेश मंडळांसोबत महापालिका प्रशासनाची बैठक झाली. गणपती मिरवणूक या पुलावरुन जाताना मेट्रोमुळे अडचण येईल म्हणून हे काम रोखण्यात आलं होतं. मात्र मेट्रोचं काम सुरु राहील, असं या बैठकीत ठरलं. तेव्हा गणेश मंडळं या निर्णयावर तयारही झाली होती. तरीही मेट्रोचं काम सुरु होऊ नये म्हणून गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी पुलावर जाऊन आंदोलनं केलीत. ज्यानंतर गणेश मंडळांनी मेट्रो कामाबाबतीत सुचवलेले पर्याय आणि मेट्रोची बाजू जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो पदाधिकाऱ्यांशी बैठकीत चर्चा केली. ज्यानंतर बैठकीत ठरलेल्या बाबींची माहिती मेट्रोकडून एक पत्र लिहून पुणे महापालिकेला देण्यात आलीये.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, आम्ही फक्त पुण्याचा विकास करत आहोत. आम्ही गणेश मंडळ यांना एकत्रित घेऊन हा निर्णय घेतला आहे. तरीही विरोधक लकडी फुल हवा म्हणून आंदोलन करत आहेत.
