दिलासादायक : आज पुणे शहरात व जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू नाही
पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 33 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 77 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज पुणे शहरात व जिल्ह्यात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 83 हजार 23 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 384 इतके रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 830 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 81 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 4239 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
