महाज्योतीच्या वतीने ओबीसी विद्यार्थ्यांना टॅबचे मोफत वाटप
पुणे : ]महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपुर ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. ही संस्था ओबीसी,विमुक्त जाती व भटके जमाती विशेष मागासवर्गीय मधील विद्यार्थी व समाजाच्या विकासाठी काम करीत आहे. त्याचाच एक भाग महाज्योतीने ओबीसी भटके विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग यांचेसाठी जेईई, निट व सीईटी स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन मोफत प्रशिक्षण सुरू केले. त्यासाठी तज्ञ प्राध्यापकांकडुन आँनलाईन क्लास घेतले जात आहे. अशा महाराष्ट्रातील महाज्योतीकडे नोंदणी झालेल्या तीन हजार विद्यार्थ्यांना मोफत टॅब चे वाटप सुरू आहे.
अशा या योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील ५९ विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे आँनलाईन नोंदणी करून मोफत प्रशिक्षणात सहभाग नोंदविलेला होता. अशा सर्व विद्यार्थ्यांना महाज्योतीच्या वतीने मोफत टॅब चे वाटप महाज्योतीचे संचालक व प्रदेश राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष प्रा. दिवाकर गमे यांच्या हस्ते आज सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी, पुणे येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहआयुक्त ,मा. संगिताताई डावखर,सामाजिक न्याय विभाग पुणे या होत्या. स्टुडंट हेल्पींग हँडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर, मंजिरीताई धाडगे, प्रदेशाध्यक्षा महात्मा फुले समता परीषद,मा. पंढरीनाथ बनकर,शहर अध्यक्ष हे हजर होते.
प्रा. दिवाकर गमे सर म्हणाले, महाज्योतीने या वितरिक्त महाराष्ट्रातील २००० विद्यार्थ्यांना एमपीएससी स्पर्धा परीक्षेसाठी मोफत आँनलाईन प्रशिक्षण देत आहे. त्यासाठी पुण्याच्या ज्ञानदिप अँकाडमी मार्फत हे प्रशिक्षण दिले जात आहे.तर १००० विद्यार्थ्यांना युपीएससी साठी दिल्ली येथील नामवंत श्रीराम अकॅडमी मार्फत आँन लाईन प्रशिक्षण देणे सुरू आहे. या सुध्दा तीन हजार विद्यार्थ्यांना महाज्योती मोफत टॅब व मोफत सहा जीबी डेटा स्पर्धा परीक्षा पुस्तकासहीत मोफत देणार आहे. तसेच 500 पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधनकार्य पुर्ण करण्यासाठी,महाज्योती दरमहा ८०० विद्यार्थ्यांना फेलोशिप पाच वर्षे देणार आहे.
कौशल्य विकास योजनेमार्फत विविध क्षेत्रात कौशल्यपुर्ण रोजगाराची संधी मिळावी,म्हणुन ओबीसी भटके विमुक्त जातीच्या चाळीस हजार विद्यार्थ्यांनासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जेईई, नीट सीईटी २०२३ साठी अशाच प्रकारची आँनलाईन प्रशिक्षण व मोफत टॅब साठीच्या योजनेची नोंदणी महाज्योतीच्या कडे झाली असुन पुढील वर्षात महाज्योती १२ हजार विद्यार्थ्यांना टॅब वाटप करणार आहे.
