Tuesday, November 3, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील शाळा आज गजबजल्या …

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या पुण्यातील शाळा अखेर आज गाजबाजल्या. आज पासून पुणे शहरातील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शाळेत उत्साहाचे आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

राज्यातील इतर भागातील काही शाळा 1 डिसेंबर पासूनच सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र ओमिक्रॉनच्या धास्तीने पुण्यातील शाळा या 15 डिसेंबरपर्यंत (पहिली ते सातवीचे वर्ग) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेकडून घेण्यात आला होता. त्यानुसार आज पुणे महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरू करण्यात आल्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून पुणे महानगरपालिकेने इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग

पद्मावती भागातील राजीव गांधी ई लर्निंग स्कूल स्कूलचे प्राध्यापक राजीव कुमार म्हणाले, आम्ही पुणे महानगरपालिकेने घालून दिलेल्या सर्व कोविड नियमांचे पालन करून शाळा सुरू केली आहे. दिडवर्षा नंतर शाळा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. इतके दिवस ऑनलाईन शाळा भरवली पण शिकवण्याचा खरा आनंद शाळेतच आहे.

विद्यार्थ्यांसाठी घालून दिलेल्या सूचना

  1. वर्गात आपल्याला नेमून दिलेल्या जागीच बसावे
  2. शाळेत मास्काचा वापर अत्यावश्यक आहे
  3. दोघांमध्ये सुरक्षित अंतर पाळणे आवश्यक आहे
  4. स्वच्छतागृहात गर्दी करू नये
  5. वारंवार सॅनिटायझर  वापर करावा
  6. शाळेत येताना व्यवस्थित जेवण करून यावे
  7. शाळेत येताना डब्बा आणू नये
  8. पुस्तके वह्या पेन पेन्सिल इत्यादी साहित्याची देवाणघेवाण करू नये
  9. विद्यार्थी आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये

Leave a Reply