Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

दिलासादायक : आज पुण्यात कोरोना रुग्णाचा एकही मृत्यू नाही

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 120 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 80 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिलासादायकबाब म्हणजे आज पुणे शहर व ग्रामीण भागात एकही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 79 हजार 19 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 98 हजार 31 इतके रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत पुणे शहरात 9109 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 779 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 85रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 6229 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading