धम्मविचार दिपस्तंभासारखे काम करीत मनुष्यजातील दिशा दाखवेल- भन्ते झेन मास्टर सुद्दसन
पुणेः- आज समाज दुभांगत होत असतांना, मतमतांमध्ये ध्रुव्रीकरण घडून आणले जात असतांना धम्म दिपस्तंभासारखे काम करीत समुळ मनुष्यजातील दिशा दाखवेल असा विश्वास भन्ते झेन मास्टर सुद्दसन यांनी व्यक्त केला
आडकर फाऊंडेशन आणि महामाता रमामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षी देण्यात येणारा धम्मक्रांती पुरस्कार यंदा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक अविनाश बागवे यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अॅड.प्रमोद आडकर, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका लता राजगुरु, एन.एस.यु.आय.च्या पुणे शहराच्या सचिव प्रेरणा गायकवाड आणि युवानेते कुणाल राजगुरु उपस्थित होते.
भन्ते झेन मास्टर सुदरसन म्हणाले, धम्म मानवता शिकवते. धम्माने दाखवलेल्या मार्गावर चालणारे नेतृत्व पुढे येणे गरजेचे आहे. धम्म सातत्याने मानवतावादी विचार पेरत आला आहे.अनिष्ठ रुढी, पंरपरा नष्ट करण्यासाठी धम्म विचार आवश्यक आहे. मानवाची सेवा करण्याची शिकवण धम्मात सांगितलेली आहे.धम्म मानुष्यात आंतर्गत आणि बर्हिर्गत परिवर्तन घडवून आणतो. धम्माच्या आचरणाने मानवसेवेचे इतिकर्तव्य साकार होईल याबद्दल विश्वास वाटतो.
आडकर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. नगरसेवक अविनाश बागवे यांनी पुरस्काराला थोडक्यात उत्तर दिले. नगरसेविका लता राजगुरु यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु.विठ्ठल गायकवाड यांनी केले तर आभार एन.एस.यु.आय.च्या पुणे शहराच्या सचिव प्रेरणा गायकवाड यांनी व्यक्त केले.
