नवीन वाहतूक नियम म्हणजे वाहनचालकां च्या गळ्याला फास – बाबा शिंदे
पुणे : कोरोना व लाॅकडाऊनमुळेआधी च सर्वसामान्य वाहनचालक, वाहनमालक व वाह तूक व्यवसाय अडचणीत आलेला आहे. अशा वेळी वाहनचालकांना ववाहतूकदारांना कोणता ही दिलासा देण्याऐवजी वाहतूक नि यमकरकचून आवळल्याने वाहनचालक व वाहतूकदारांच्या गळ्याला फास बसला आहे
हे नवीन जाचक वाहतूक नियम कमी करावे त.एवढीच आमची सरकारकडे मागणी आहे असे मत वाहन माल क चालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक नियम२०१९ च्या अनुषंगाने १ डिसेंबर २०२१ पासून वाह तूक नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठ्याप्रमा णावर दंडाची आकारणी करणे सुरू झाले आहे. वाहन चालवणार्या मुलांनी अथवा ड्रा यव्हरने नियमांचे उल्लंघन केल्यास मुलांच्या पालकांना वा ड्रायव्ह रच्या मालकालामोठ्या प्रमाणावर दंड केला जातो.सामान्य दुचाकी चालकाने महामार्गावरून जाताना हेल्मेट वापरणे रास्त आहे. परंतु गल्ली बोळात जवळ जायचे असले तरी त्याला हेल्मेट ची सक्ती करण्यात आली आहे, ती गैर आहे.
तसेच नियम उल्लंघणाच्या जुन्या प्रकरणाला नवीन नियमानुसार दंड आकारणी गैर आहे. मालवाहतू कदाराने गाडीमध्ये माल भरताना ओव्हर लोड केल्यास मालकास वीस हजार रुपये तसेचवाहन चालकास २० हजार रुपये दंडासह डिपार्टमेंटल दंडाची रक्कम व वाहन स्थगन (सस्पेंड) अशी प्रचंड कारवाईकरण्या त येत आहे. वाहनओव्हर लोड करून नये हे खरे असले तरी केवळ १०० किलो जास्त भ रले तरी दंडाची आकारणी होत आहे, ती अ न्यायकारक आहे.
वाहतूक पोलीस कारवाई करताना मोबाईल अँप मध्ये केवळ फोटो काढतात,परंतु तो पु रेसा नाही. प्रत्यक्ष नियम उल्लंघन झाल्याचे व्हिडिओचित्रण करणे गरजेचे आहे.सध्या वाहतूक पोलीस वाहन तपासणीच्या नावा खाली वाहनचालकांना वाट्टेल त्या ठिकाणी थाबवून दंडाची वसूली करत आहेत. याबाब त अनेक वाहनचालकांच्या तक्रारी प्राप्त झा ल्या असून याबाबत शासनाने योग्य तो निर्ण य घ्यावा.
एकीकडे सरकार उद्योग व्यवसायाच्या ‘स्टार्ट अप’ साठी कंठशोष करत आहे तरदुसरीकडे वाहन आणि वाहतूक व्यवसायाचा ‘दी एंड’ करण्याच्या मार्गावर आहे.सरकारने वाहतूक व्यवसायाच्या मागे लावलेली घरघर हीघरेघरे उध्वस्त करणारी ठरेल, यास्तव सरकारने वाहतूक नियम शिथिल करावेत,अशीमागणी बाबा शिंदे यांनी केली.
