Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे भारती विद्यापीठमध्ये स्वच्छता अभियान

पुणे : राष्ट्रीय सेवा योजनेच्या महाराष्ट्र व गोवा विभागीय कार्यालय आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या एरंडवने (कोथरुड) येथील कॅम्पसमध्ये एक दिवसीय स्वच्छता अभियान उत्साहात पार पडले.इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट(आय.एम.ई.डी), वाय.एम. कॉलेज,लॉ कॉलेज,फ़ार्मसी कॉलेज या महाविद्यालयांनी सहभाग घेतला.भारत सरकारच्या ‘स्वच्छता ऍक्शन प्लॅन’ उपक्रमाअंतर्गत आयोजित अभियानात राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक श्री कार्तिकेयन, विद्यापीठाचे समन्वयक डॉ.अविनाश म्हेत्रे,आय.एम.ई.डी चे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर,डॉ.विवेक रणखांबे,डॉ.आत्माराम पवार,डॉ.बेंडाळे आणि सर्व कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते.१५० स्वयंसेवकांनी भाग घेतला.

श्रमदान कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलताना कार्तिकेयन म्हणाले की व्यक्तिमत्व विकासासाठी राष्ट्रीय सेवा योजना हा स्वातंत्र्योत्तर कालखंडातील एक यशस्वी मार्ग ठरला आहे.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवकांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या संधीबद्दल त्यांनी स्वयंसेवकांना माहिती दिली.

डॉ.सुचेता कांची, प्रा.श्रेयस डिंगणकर,प्रा.प्रतिमा गुंड यांच्यासह आय एम ई डी भारती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या टीमने संयोजन केले.आय. एम.ई. डी. भारती विद्यापीठाच्या कोअर टीम सदस्या कु.एन्सी यांना स्वच्छता मोहिमेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सचिन वेर्णेकर होते.डॉ.कांबळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading