राज ठाकरे पुणे महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर
पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जवळ आल्या असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षा कडून तयारी चालू झाली आहे. प्रत्येक पक्षाचे मंत्री व नेते पक्षाची रणनीती ठरविण्याकरिता पुणे दौरा करत आहेत अशाच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या पक्षाची रणनीती ठरविण्याकरिता पुणे दौऱ्यावर येत आहेत. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत मनसेचे नेते राजेंद्र वागसकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, सरचिटणीस किशोर शिंदे, उपाध्यक्ष बाळा शेंडगे, शहराध्यक्षा वनिता वागसकर, सुशिला नेटके जिल्हाध्यक्षा उपस्थित होते.
राज ठाकरे यांचा पुणे शहर दौरा कार्यक्रम
बुधवारी सकाळी 9 ते 11 छत्रपती शिवाजी नगर मतदार संघ स्थळ बॅकवेट हॉल झाशीची राणी चौक बालगंधर्व, दुपारी 12 ते2 , कोथरूड मतदार संघ स्थळ रत्ना बॅक्वेट हॉल कर्वेनगर, सायंकाळी साडेचार ते साडेपाच खडकवासला मतदार संघ स्थळ धायरेश्वर हॉल धायरी, सायंकाळी सहा ते साडेसात हडपसर मतदार संघ राज बॅक्वेट हॉल कोंढवा गाव.
गुरुवार सकाळी 9 ते 11 कसबा मतदार संघ स्थळ केसरीवाडा नारायण पेठ, 12 ते 2 पर्वती मतदारसंघ स्थळ एकनाथ सभागृह बिबवेवाडी, चार ते साडेपाच कॅन्टोन्मेंट मतदार संघ स्थळ नंदी कॉल मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर ताडीवाला रोड, सहाते साडे सात वडगाव शेरी मतदारसंघ स्थळ सरगम हॉटेल गुंजन टॉकीज जवळ नगर रोड येरवडा.
राजेंद्र वागसकर हे म्हणाले आमच्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्यापासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर येत आहेत. ते आगामी पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत. व महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणनीती कशी ठरवायची याचे नियोजन करणार आहेत. असे वागसकर म्हणाले.
