Wednesday, June 17, 2026
ENTERTAINMENTLatest News

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ मध्ये सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी!

पुणे : झी टॅाकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा नुकताच मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. सुवर्णदशक सोहळ्याची सुवर्णझळाळी आणि मराठमोळ्या ग्लॅमरचा जबरदस्त जलवा रसिकांना या सोहळ्यात अनुभवायला मिळणार आहे.बॅालिवूडमध्ये ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सुभाष घई, तसंच हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखही या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता.

यावेळी भारत गणेशपुरे, अभिजीत चव्हाण, सुनील तावडे, रोहित चव्हाण, अंकुर वाढवे आदी कलाकारांनी या स्कीटच्या माध्यमातून उपस्थितांना हसवलं. ‘या सोहळयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादिदी, रमेश देव, सचिन पिळगावकर, अंकुश चौधरी, अलका कुबल, अशोक शिंदे, मृणाल कुलकर्णी,  तेजस्विनी पंडीत, पूजा सावंत, नागराज मंजुळे, प्रवीण तरडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर क्रांती रेडकर, आकाश ठोसर, केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर अशी अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. हा नेत्रदिपक सोहळा लवकरच झी टॅाकीजवर प्रसारीत होणार आहे.

या सोहळयाविषयी बोलताना ‘झी’च्या मराठी मुव्ही क्लस्टरचे चीफ चॅनेल ऑफिसर बवेश जानवलेकर म्हणाले, ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सोहळयाचे रसिकांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. ते स्थान अबाधित राखण्याचा आमचा कायमच प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. या वर्षी सुवर्णदशक सोहळा सादर करतानाही हिच भावना आमच्या संपूर्ण टिमच्या मनात होती. मला विश्वास वाटतो तो विश्वास सार्थ ठरविण्याचा आम्ही यावर्षीही जोरदार प्रयत्न केला आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading