Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त पद्धतीने घेतल्यास भाजपचाच अध्यक्ष होईल – चंद्रकांत पाटील

पुणे :  विधान परिषद निवडणुकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा 362 मतानी विजय झाला. त्यावर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 वर्षा मध्ये पक्षा साठी खूप काम केले त्यामुळे त्यांना विधान परिषद निवडणुकीमध्ये पक्षाने संधी दिली. विधानसभा  अध्यक्ष निवडणूक छुपा पद्धतीने न घेता
गुप्त पद्धतीने घेऊन दाखवा. भाजपचाच अध्यक्ष होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. 

चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारा बरोबर विविध मुद्यावर संवाद साधला. पाटील म्हणाले,पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे व बाकीचे नेते यांनी पक्षासाठी भरपूर चांगले काम केले आहे. पक्ष प्रत्येकाला कामानुसार संधी देतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबद बोलताना पाटील म्हणाले की, प्रभाग रचनेचे नियम हे सुप्रीम कोर्टाने ठरवलेले आहेत. पुण्यात पोलिसांकडून नागरिकाकडून हेल्मेट नसेल घातले तर दंड वसूल केला जात आहे त्यावर पाटील म्हणाले भाजप ह्या विरोधी आहे. येथील पुढील काळात भाजप हेल्मेट सक्ती विरोधात रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading