Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

नाट्यविषयक खेळातून मुले लूटत आहेत आनंद

पुणे : लॉक डाऊनच्या काळात घरात बसून कंटाळलेली मुले ‘चला खेळूया नाटक’ या अनोख्या उपक्रमात सहभागी होऊन भावभावनांना वाट करून देत नाट्यविषयक खेळांचा आनंद लूटत आहेत.

नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे 8 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांसाठी दर रविवारी सदाशिव पेठेतील गोपाळ हायस्कूल येथे हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हसत खेळत मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देऊन मनोरंजक पद्धतीने व्यक्तिमत्व विकास घडविण्याचा हा अभिनव प्रयोग असल्याचे नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी सांगितले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या रविवारी नाट्य दिग्दर्शन अमोल जाधव यांनी तर दुसर्‍या रविवारी युवा कलावंत कुणाल सरदेशपांडे यांनी मुलांना नाट्यविषयक खेळ शिकविता शिकविता तत्परताअचूकतासंवेदनशिलता या गुणांविषयी मार्गदर्शन केले. पुढील दोन रविवारी अनुक्रमे ज्येष्ठ दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे आणि अभिनेते धनंजय सरदेशपांडे ‘चला खेळूया नाटक’ या उपक्रमात सहभागी होऊन मुलांशी हितगुज करणार आहेत.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading