Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

संजय राऊत यांनी दिलेली ‘ती’ प्रतिक्रिया योग्यच – उदय सामंत

पुणे : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आशिष शेलार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया योग्यच असल्याचं मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुणे विद्यापीठाच्या 119 व्या पदवीप्रदान समारंभासाठी पुण्यात आले असता उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यातील महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन घेण्याचे पर्याय उपलब्ध असून जिथे शक्य असेल त्या प्रकारे परीक्षा घ्याव्यात परीक्षा फक्त ऑनलाइन होतील असे सोशल मीडियावर वायरल होणार पत्र खोटं असल्याचं देखील सामंत यावेळी म्हणाले. त्याचबरोबर राज्यभरातील परीक्षांमधील गोंधळ पाहता परीक्षा घेणाऱ्या यंत्रणा अधिकच सक्षम करायला हव्यात असे देखील उदय सामंत यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading