Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

पुणे शहरात 12 ते 17 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या तब्बल 7 लाख

पुणे : केंद्र शासनाने पुणे जिल्ह्यातील 12 ते 17 वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याबाबत सूतोवाच केले आहे. मात्र, पुणे शहराला लसीकरणाबाबत केंद्र तसेच राज्य सरकारकडून अद्यापही कोणताही आदेश आलेला नाही. मात्र मुलांना झायकोव्ह डी ही लस दिली जाईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव डॉ. राजेश भूषण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामध्ये लसीकरण कमी झालेल्या जिल्ह्यांची यादीदेखील केंद्राने जारी केली आहे. देशभरातून 28 हजारांहून अधिक जणांवर झायकोव्ह डी ची चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 1 हजार जण 12 ते 17 वयोगटातील होते.

राज्यांमधील शाळा हळूहळू सुरु होऊ लागल्या आहेत. लहान मुलांना कोरोनापासून सुरक्षित करण्यासाठी लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसीवर काम करत आहेत. सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातीलमुलांवर लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

याबाबत महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, ‘केंद्र व राज्य शासनाकडून मुलांचे लसीकरण करण्याबाबत अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. परंतु, पुण्यात एकूण मुलांची संख्या 6 ते 7 लाखांच्या आसपास आहे. सूचना आल्यानंतर त्यांचे लसीकरण करण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading