Saturday, October 31, 2026
ENTERTAINMENTLatest NewsLIFESTYLENATIONALTOP NEWS

Miss Universe 2021 : भारताची हरनाज संधू ठरली यंदाची ‘मिस युनिव्हर्स’; तब्बल 21 वर्षांनंतर भारताला मिळाला किताब 

नवी दिल्ली : भारताच्या हरनाज संधूने  ‘मिस युनिव्हर्स 2021’ (Miss Universe 2021} चा किताब आपल्या नावे केला आहे. यंदा 70  वी ‘मिस युनिव्हर्स’ सौंदर्यस्पर्धा इस्त्राइलमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 75  हून अधिक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.

 ‘मिस युनिव्हर्स 2021’ च्या टॉप10  मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या हरनाज संधूने (Harnaz Sandhu) आपले स्थान निश्चित केले. यापूर्वी अभिनेत्री लारा दत्ताने 2000 साली मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. त्यानंतर तब्बल 21 वर्षांनी हरनाजने मिस युनिव्हर्सचा किताब भारतात आणला आहे. त्यामुळे भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. या स्पर्धेत हरनाजने पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या स्पर्धेकांना मागे टाकत ‘मिस युनिव्हर्स 2021’ चा किताब आपल्या नावे केला. मेक्सिकोची माजी मिस युनिव्हर्स 2020  अँड्रिया मेझा हीने हरनाजला तिचा मुकूट परिधान केला.

स्पर्धेच्या सुरुवातीला जजला आकर्षित केल्यानंतर हरनाजने स्विमसूट राऊंडच्या रॅमवर आत्मविश्वास आणि उत्तम खेळी दाखवली. आकर्षक मरून रंगाचा कॅप स्लीव्ह स्विमसूट परिधान केलेल्या हरनाजने सर्वांना प्रभावित केले आणि टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले.

या सौंदर्यस्पर्धेत पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर विजयी होता आले. मात्र भारताच्या हरनाजने ‘मिस युनिव्हर्स 2021’ मध्ये टॉप फेव्हरेट स्पर्धक जागा मिळवत “मिस युनिव्हर्स 2021  वर आपले नाव कोरले.

हरनाजने २०१७ मध्ये टाईम्स फ्रेश फेस बॅकमधून तिच्या सौंदर्य स्पर्धांच्या प्रवासाला सुरुवात केली. 21 वर्षीय हरनाज  सध्या पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतेय. तिने फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९ सह अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकला आहेत. यासोबत अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.

Leave a Reply