म्हाडाची परीक्षा रद्द झाल्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन
कोल्हापूर : म्हाडाच्या विविध पदांकरिता आज संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती. ती परीक्षा राज्य गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रात्री दोन वाजता ऑनलाईन येऊन रद्द करण्यात आली असे सांगितले. शासनाने आशा प्रकारे परीक्षेच्या आदल्या रात्री ती रद्द करणे अतिशय दुर्भाग्य पूर्ण आहे. या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी बसेस बंद असताना देखील प्रवास करून परीक्षा केंद्रावर पोहचले होते. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थी अत्यंत संतप्त आहेत. या विद्यार्थ्यांचे झालेले आर्थिक नुकसानास जबाबदार कोण असा प्रश्न विचारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने दसरा चौक येथे या शाशन निर्णयाचा निषेध करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे, प्रसाद लष्कर, वृषभ खोत, पवन जगदाळे, मारोती देलमाडे, अरिहंत पाटील, प्रथमेश बोने, महेश कुंभार, दर्शन कामटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
